Ad will apear here
Next
‘सेवासदन’तर्फे फराळ व कलात्मक वस्तूंचे प्रदर्शन
पुणे : येथील सेवासदन संस्थेच्या दिलासा या कार्यशाळेतर्फे दिवाळीसाठीच्या फराळ व कलात्मक वस्तूंच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन २७ ऑक्टोबर २०१८ रोजी सकाळी १०.३० ते रात्री नऊ या वेळेत एरंडवणे येथील सेवासदन इंग्रजी माध्यम शाळेत भरणार आहे.  

हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले आणि विनामूल्य असणार आहे. प्रदर्शनातील फराळ व कलात्मक वस्तू या सेवासदन संस्थेतील विद्यार्थ्यांनी बनविल्या असून, त्याची विक्री देखील या प्रदर्शनात केली जाणार आहे. प्रौढ मतिमंद व्यक्तींच्या विकासासाठी पुण्यातील सेवासदन ही संस्था कार्यरत आहे. मतिमंद व्यक्तींचे पुनर्वसन करून त्यांना व्यावसायिक प्रशिक्षणाद्वारे स्वावलंबी करणे, विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळवून देणे, समाजात जागरूकरता निर्माण करून त्यांना सन्मान मिळवून देणे या उद्दिष्टांवर सेवासदन काम करते.

प्रदर्शनाविषयी :
दिवस :
शनिवार, २७ ऑक्टोबर २०१८
वेळ : सकाळी १०.३० ते रात्री नऊ
स्थळ : सेवासदन इंग्रजी माध्यम शाळा, पटवर्धन बाग, एरंडवणे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/AZLVBT
Similar Posts
‘सेवासदन’च्या वतीने फराळ व कलात्मक वस्तूंचे प्रदर्शन पुणे : येथील सेवासदन संस्थेच्या दिलासा कार्यशाळेच्या वतीने दिवाळीसाठीच्या फराळ व कलात्मक वस्तूंच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, १८ ऑक्टोबर व शनिवार, १९ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० ते रात्री ८.३० पर्यंत हे प्रदर्शन पटवर्धन बाग येथील दिलासा कार्यशाळा येथे भरणार असून, ते सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे
दिवाळीच्या अविस्मरणीय क्षणांची शिदोरी सध्या रत्नागिरीत असलेल्या आणि पुणे जिल्ह्यातील कराळेवाडीत माहेर असलेल्या रेश्मा मोंडकर (पूर्वाश्रमीच्या संगीता कराळे) यांनी त्यांच्या लहानपणीच्या दिवाळीच्या स्मृतींना दिलेला हा उजाळा...
आदिवासी निर्मित पर्यावरणपूरक दिवे, कंदील यांचे प्रदर्शन पुणे : देशभरातील आदिवासी आणि ग्रामीण कलाकारांनी तयार केलेले पर्यावरणपूरक दिवे, आकाशकंदील, लामणदिवे, तसेच दिवाळीसाठी भेटवस्तू आणि गृह सजावटीच्या अनेक कलाकृतींचे प्रदर्शन ट्राईब छत्री कलादालनात भरविण्यात आले आहे.
साठ वर्षांपूर्वीची अविस्मरणीय दिवाळी पुण्यातील सेवानिवृत्त अध्यापक शशिदा इनामदार यांनी त्यांच्या बालपणीच्या (साठ वर्षांपूर्वीच्या), इस्लामपुरातल्या दिवाळीच्या जागवलेल्या या आठवणी...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language